Latest

चंद्रपूर : वन्यप्राण्यांसोबतच्या झूंजीत बिबट्याचा मृत्यू

निलेश पोतदार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वन्यप्राण्यांसोबत झालेल्या झूंजीत एका तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना (रविवारी) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात घडली. बिबट्या या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आला आहे.

सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गुंजेवाही उपवनक्षेत्रातील कन्हाळगाव शेतशिवारात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बिबट मृतावस्थेत आढळून आल्‍याचे काही नागरिकांना दिसून आले. तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. बिबट नर जातीचा असून, अंदाजे तीन वर्षे वयाचा आहे.

वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून, यामध्ये बिबट्याचा मृत्यू झुंजीमध्ये झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. मृत बिबट्याचे सर्व अवयव शाबूत आहेत. सिंदेवाहीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सूरपाम यांनी शवविच्छेदन केले.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT