Latest

खेलरत्नच्या ठिकाणी परमवीर चक्रचा फोटो! संबित पात्रा भयंकर ट्रोल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केल्याची घोषणा केली. या निर्णयावर देशभरातून काैतुक करण्यात आले.

देशभरातील भाजपच्या नेत्यांनीही पंतप्रधान मोदींचे काैतुक केले. यात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही ट्विट करुन काैतुक केले. पण या ट्विटमध्ये त्यांनी खेलरत्न च्या ठिकाणी परमवीर चक्रचा फोटो ट्विट केला. त्यामुळे संबित पात्रा ट्रोल झाले आहेत.

संबित पात्रा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांनी लोकसभेची निवडणुकही लढली आहे, पण ते पराभूत झाले. ते भाजपतर्फे डिबेटमध्ये सहभागी होतात. ते देशात नेहमी चर्चेत असतात. संबित पात्रा एकदा एका टीव्ही चॅनेलच्या डिबेटमध्ये ट्रिलियन मध्ये किती शून्य असतात या मुद्द्यावरुन ट्रोल झाले होते. आता ते आज पुन्हा ट्रोल झाले आहेत.

पंतप्रधान मोदींच काैतुक करण्यासाठी संबित पात्रा यांनी ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी खेलरत्न चा फोटो समजून परमवीर चक्रचा फोटो लावला. हे ट्विट पाहताच नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

नेटकऱ्यांनी ध्यानचंद यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा का आहे? यावरही चर्चा करत आहेत.

पीएम मोदींनी आता राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराच नाव बदललं!

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत केली आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार करण्याबाबत देशातील नागरिकांकडून अनेक सूचना आल्या होत्या. लोकांच्या भावनांचा आदर ठेवून खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघाने अपवादात्मक कामगिरी केली. हॉकीमध्ये आमच्या खेळाडूंनी जी इच्छाशक्ती दाखवली. ती भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

हे ही वाचलत का :

वास्तविक राजीव खेलरत्न पुरस्कार विजेत्याला जे सन्मानचिन्ह दिले जाते त्यामध्ये मध्यभागी राजमुद्रा आणि त्याच्या सभोवती हिंदी आणि इंग्रजीमध्ये राजीव गांधी खेलरत्न असे लिहिलेलं असत.वरील ट्विट मागील पुरस्कार जाहीर झाल्यानंतरचे आहेत.

SCROLL FOR NEXT