Latest

खासदार छत्रपती उदयनराजे चार दिवसांपासून रुग्णालयात प्रकृती ठीक

backup backup

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथील संसदीय अधिवेशन आटोपून पुणे येथे आल्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. चार दिवस त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली.

खासदार छत्रपती उदयनराजे यांना कोरोनाची बाधा झाल्याबाबत सोशल मिडीयावर बातम्या व्हायरल होत असल्याने समर्थकांकडून वरील माहिती देण्यात आली.

गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या कोरोना बाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे उदयनराजे भोसले अधिवेशन सोडून परतले होते. त्यांच्या प्रकृती आता बरी आहे.

मात्र, दरम्यानच्या काळात उदयनराजे भोसले यांना कोरोना सदृश्य लक्षणे असून गेल्या चार दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील दोन दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचेही त्यांच्या निवटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

उदयनराजे भोसले यांनी कोरोनाच्या काळात दुकाने सुरु करावीत तसेच लोकांची विनाकारण अडवणूक करु नये, यासाठी भीकमांगो आंदोलन केले होते. कोरोनाच्या काळात प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता.

हे ही पाहा :

SCROLL FOR NEXT