सरवडे; पुढारी वृत्तसेवा : शेतात तरवे टाकण्यासाठी साफसफाई करत असताना शिकारीसाठी ठेवलेल्या हातबॉम्बचा स्फोट होऊन संजीवनी अशोक चौगले (वय 50, रा. पंडेवाडी, ता. राधानगरी) या जखमी झाल्या. रविवारी सकाळी ही घटना घडली.
सावर्डे पाटणकर हद्दीतील डोंगरात 'मोळ' नावाच्या शेतात संजीवनी तरवे टाकण्यासाठी कुटुंबासह गेल्या होत्या. तेथे दगडासारखी वस्तू दिसल्यानंतर त्यांनी ती बांधावर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा त्यांच्या हातातच त्याचा स्फोट होऊन त्या बाजूला फेकल्या गेल्या. स्फोटाचा आवाज ऐकून कुटुंब व परिसरातील शेतकरी धावून आले. नेमका प्रकार सुरवातीला समजला नाही. मात्र स्फोट झालेल्या ठिकाणी पाहिले असता लहान रानटी प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरला जाणारा हातबॉम्ब असल्याचे समजून आले. राधानगरीचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी तपास करत आहेत.
हेही वाचलंत का ?