Latest

केईएम रुग्णालय : एक ते दीड तासातच ब्रेन स्ट्रोकचे निदान

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पालिकेच्या केईएम रुग्णालयात न्युरो विभागात उपचार युनिट सुरु असून स्ट्रोकवर लवकर निदान करणे या युनिटचे उद्दीष्ट्य आहे. त्यामुळे रुग्ण दाखल झाल्याच्या केवळ एक ते दिड तासात येथे तपासणी करून निदान होत असल्याने रुग्णांना फायदा होत आहे.

पालिकेच्या केईएम रुग्णालयात न्युरो विभागात उपचार युनिट सुरु असून यात नावीन्य पूर्ण अत्याधुनिक सुविधा देण्यावर केईएम रुग्णालयाचा भर असतो. पूर्वी रुग्ण आल्यावर टेस्ट आणि निदान चार तास जात असत.आता मात्र एक ते दिड तासात निदान होत आहे. रुग्ण घरुन निघून उपचार सुरु होण्याची वेळ यामुळे कमी झाली आहे. यातून मेंदूच्या पेशी वाढायला मदत होते असल्याचे केईएम रुग्णालयातील न्युरो सर्जन डॉ. नितीन डांगे सांगतात.

कोविडनंतर स्ट्रोकचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या न्यू नॉर्मलमध्ये सुद्धा दररोज दोन ते तीन रुग्ण येत आहेत. मात्र हे देखील वेळेत येत नसल्याचे सांगण्यात आले. लक्षण दिसू लागल्या पासून 24 तासात आल्यास पहिल्या साडे चार तासात इंजेक्शन देणे गरजेचे आहे. तर ब्लॉकेजेसच्या पहिल्या लक्षणापासून साडे चार तासात इंजेक्शन दिले जाते.

त्यानंतर एमआरआय करून गुठळीचे स्वरुप पाहिले जाते. मोठी गुठळी असल्यास एंजिओग्राफीमार्फत गुठळी काढली जाते. मात्र 24 तासाच्या गोल्डरपिरीयडमध्ये एंजिओग्रोफी होणे आवश्यक आहे. मात्र रुग्ण जेवढ्या लवकर येईल तेवढे उपचाराला बळकटी मिळते. कोविडमुळे गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढले होते.

गुठळ्या मेंदू, हृदय, फुप्फुस, हात पायात कुठेही होत होत्या. मात्र आता नॉन कोविड स्ट्रोकचे रुग्ण आढळू लागले आहेत. कोविडचा दुसरा फायदा म्हणजे त्रास झाल्या झाल्या रुग्ण रुग्णालयात येऊ लागला. कोवडमुळे आरोग्याची जागरुकता वाढली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT