Latest

कॅटरीना कैफ-विकी कौशल यांनी गुपचुप उरकला साखरपुडा?

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कॅटरीना कैफ-विकी कौशल यांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर येतेय. पण, कॅटरीना कैफ-विकी कौशल यांच्याकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अधिक वाचा – 

खूप दिवसांपासून कॅटरीना कैफ-विकी कौशल यांच्यातील डेटींगची चर्चा रंगली होती. दोघांच्या फॅन्सनादेखील या क्यूट कपलचे एकत्र येणं आवडलं होतं. नेहमीचं या दोघांची चर्चा रंगलेली असते.

अधिक वाचा –

बऱ्याच दिवसांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. पण, त्यांनी याबाबत स्वतः कधीचं कबुल केलेलं नव्हतं.
पण, आता विक्की – कॅटरीना कैफ संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा – 

विक्की कौशल-कॅटरीना कैफ

मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांनी साखरपुडा केल्याची चर्चा होत आहे. तर सोशल मीडियावर ही अफवा असल्याचे म्हटले जात आहे.
म्हणून विक्की-कॅटरीनाचा साखरपुडा झाला आहे की नाही, याबाबत माहिती समोर आलेली नाही. स्वत: कॅट-विक्कीकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाहीये. पण, त्यांचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात आहे.

पार्टीत दिसले एकत्र

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट शेरशाह रिलीज होण्यापूर्वी पार्टी झाली होती. यामध्ये विक्की आणि कॅटरीना एकत्र दिसले होते. यावेळी कॅटची बहीण इसाबेल कैफदेखील होती.

Viral Bhayani यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे.
हे देखील वाचलंत का-

https://youtu.be/0C9F33TFAhc

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT