Latest

अकोला : लसीकरणाच्या नावाखाली घरात प्रवेश,अकोटात भरदिवसा सशस्त्र दरोडा

backup backup

अकोला पुढारी वृत्तसेवा : कोरोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत अकोट शहरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 31 ऑगस्ट रोजी घडली. या दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करुन तोडांत बोळे कोंबून दोराने एका खालीत बांधून ठेवले होते. या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शहरातील रहदारीच्या रस्त्यावर बुधवार वेस परिसरात व्यापारी अमृतलाल सेजपाल हे आपल्या कुंटबासह वरचे माळ्यावर राहतात. त्यांच्या घरी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजता दरम्यान काही महिला व पुरुष आले. त्यांनी दरवाजा ठोठावत कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचे सांगितले.

यावेळी दरवाजावरच सेजपाल यांची नात देलिशा हिला मी विद्यार्थी असल्याने लस घेतली नाही सांगितले. त्यामुळे या बनावट पथकाने घरात कोणकोण आहे अशी विचारणा करताच देलिशा हिला शंका आल्याने तीने ओळखपत्र मागितले असता या दरोडेखोर टोळीतील एका महिलेने दरवाजा जोरात लोटत घरात प्रवेश केला. घरातील वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल,त्यांची पत्नी इंदुबहन सेजपाल, नात देलिशा यांना मारहाण करीत त्यांच्या तोंडात बोळे कोंबले. दोरीने बांधून एका खोलीत कोंडून ठेवले.

अमृतलाल सेजपाल यांना जबर मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर घरातील सामान हुसकले. कपाट फोडले. दरम्यान दुसरीकडे एका खोलीत बंद असलेल्या आबा-आजी व नातीने कशीतरी तोडांचे बोळ काढून खिडकीतून आरडाओरडा केला तेव्हा शेजारी धावत आले. तोपर्यत दरोडेखोरांनी बाहेरून घराचा दरवाजा बंद करुन पळून गेले होते.

दरम्यान शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडून या तिघांची सुटका केली. तिघेही खुपच घाबरले होते. यावेळी अमृतलाल सेजपाल जखमी असल्याने त्यांच्यावर घरीच डॉ. विशाल इंगोले यांनी उपचार केले. विशेष म्हणजे हा परिसर खुपच गजबजलेला असून बाजारपेठ आहे. तर अमृतलाल सेजपाल यांचा मुलगा यश्वीन, सुन भावना व लहान नातु शौर्य हे बाहेरगावी खामगाव गेले होते. दरोडेखोरांनी तीचे जवळचा एक मोबाईल लंपास केला आहे. दरोडेखोरांनी घरातील किती रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबतची चौकशी सुरु आहे. माहीती मिळताच घटनास्थळावर शहर पोलिस निरिक्षक प्रकाश अहिरे यांनी पोलिस पथकासह धाव घेतली.

हे ही वाचलत का :

ओंकारेश्वर : एक अद्भुत ज्योतिर्लिंग

SCROLL FOR NEXT