Latest

Zika virus in Karnataka : कर्नाटकध्ये पाच वर्षाच्या मुलीला झिका विषाणूची लागण

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटक सरकारचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी सोमवारी (दि. १२) याबाबत माहिती दिली. झिका या विषाणूची लागण झालेली लहान मुलगी ही रायचूर जिल्ह्यातील आहे. (Zika virus in karnataka)

कर्नाटकमधून 5 डिसेंबर रोजी पुणे प्रयोगशाळेत तीन रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील दोन नमुने हे निगेटिव्ह आले तर, एका नमुन्याचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला. प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार लहान मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. (Zika virus in karnataka)

आरोग्यमंत्री सुधाकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रायचूर जिल्ह्यातील पाच वर्षाच्या मुलीमध्ये झिका विषाणू आढळून आला आहे. राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे ही परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच राज्य सरकार लवकरच याबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबवून महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. तसेच आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली जातील. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही, असा दिलासा त्यांनी दिला.

काही महिन्यांपूर्वी केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झिका विषाणूचे रुग्ण आढळून आले होते. कर्नाटकमध्ये आढळून आलेली ही पहिलीच घटना आहे. रुग्णांची डेंग्यू आणि चिकुनगुनियासाठी चाचणी केली असता ही बाब समोर आली आहे. जवळपास १० टक्के नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती मंत्री सुधाकर यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT