Latest

ZEM New Car : पर्यावरणातील प्रदुषित हवा शोषूण घेणारी कार, जाणून घ्या याबाबत अधिक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात नव नवे बदल होताना दिसून येत आहेत. सगळीकडे इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारची खूप चर्चा आहे. कारच्या सध्याच्या नव्या निर्मितीतील बदल हा पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न अधोरेखित करत आहे. नेदरलँडमधील (Netherlands) एका महाविद्यालयीन तरूणाने एक नवी कार (ZEM New Car) बनवली आहे. या कारचे वैशिष्ट्य असे आहे की, ती कार पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाही एवढच नाही तर, पर्यावरणात याआधी दुषित झालेली हवा देखील स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते.

पर्यारणातील कार्बन शोषून घेणारी कार

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार Eindhoven University of technology च्या विद्यार्थ्यांनी या नव्या कारचा अविष्कार केला आहे. टीयु / इकोमोटीव्हच्या (TU / Ecomotive) विद्यार्थी समुहाने झेम (ZEM New Car) नावाची झिरो इमिशन मोबिलिटी (Zero Emission Mobility) कार बनवली आहे. कारच्या आसपास असणारे कार्बनचे उत्सर्जन कमी करणे हे या झेम कारचे वैशिष्ट्य आहे. बीएमडब्लूच्या लुकशी साधर्म्य साधणाऱ्या या कारचे डिझाईन आकर्षक असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. ही कार जितक्या कार्बनचे उत्सर्जन करते, त्याहीपेक्षा ज्यादा पर्यावरणातील कार्बन शोषूण घेते. या वैशिष्ट्यामुळे ही कार सर्वात पर्यावरणपूरक कार असल्याचे सांगितले जात आहे.

नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या कारचे आकर्षक डिझाईन पाहताना विद्यार्थी

रिसाईकल प्लॅस्टिक पासून बनलेली ZEM कार

टीयू/इकोमोटिव्हचे अधिकारी Jens Lahaije यांनी दिलेल्या माहितीनुसार 'भविष्यात जास्तीत जास्त सस्टेनेबल कार बनवणे हे त्यांचे अंतिम लक्ष्य आहे. झेम कारमध्ये दोन लोक बसू शकतात. या कारमध्ये क्लीनट्रॉन लिथियम आयन बॅटरीचा वापर केला आहे. या कारमध्ये काही पार्ट हे रिसाईकल प्लास्टिकपासून बनवलेले आहेत. या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन करत नाहीत.

या कारमध्ये दोन फिल्टर बसवलेले आहेत. यातील एक 30 किमीच्या ड्रायव्हिंग मध्ये 2 किलो इतका कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. भविष्यात चार्जिंग स्टेशनवर हे भरलेले फिल्टर रिकामे करता येईल असे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम असल्याची माहिती या टियू/इकोमोटिव्हच्या समुहाने दिली.

कारची टेस्ट ड्राईव्ह घेत असताना विद्यार्थी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT