Latest

YouTube व्हिडिओ Like करून पैसे कमवण्याच्या प्रयत्नात महिलेला ८.५ लाखांचा गंडा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : इंटरनेटचा वापर जसजसा वाढत आहे, तसे फसवणुकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. याप्रकारच्या ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन व्यवहार करताना अनेक फसवणूक प्रकरणे (YouTube Fraud) नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. याप्रकरणात गुरूग्रामची रहिवाशी असणाऱ्या महिलेची मोठी फसवणूक झाली आहे. या महिलेला YouTube वरील व्हिडिओ Like करून पैसे कमवण्याच्या प्रयत्नात ८.५ लाखांहून अधिक रुपये गमावले लागले असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

पीटीआयने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून ऑनलाइन पेमेंट केल्याने लाखो रुपये गमावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांत, विविध घोटाळे नोंदवले गेले आहेत. दरम्यान या घटनेत गुरूग्रामच्या रहिवासी सिमरनजीत सिंग नंदा या महिलेला प्रत्येक लाईकसाठी ५० रुपये मिळतील, असे आमिष दाखवून तब्बल तिची ८.५ लाख रूपये (YouTube Fraud) इतकी मोठी फसवणूक करण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, घोटाळेबाजांनी फसवणुकीतील पीडितेशी संपर्क साधला आणि सांगितले की ते व्हिडिओच्या प्रत्येक लाईकसाठी ५० रुपये देतील. संबंधित घोटाळेबाजांनी गुंतवणूकीच्या संधीबद्दल पीडितेशी व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून संपर्क साधला. या मेसेजनंतर सिमरनजीत सिंग नंदा या महिलेला टेलिग्राम लिंक पाठवली आणि प्रत्येक युट्यूब व्हिडिओसाठी एक लाईक (YouTube Fraud) करण्यास सांगितले.

यानंतर सिमरनजीतने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने नंतर व्यापारी टास्कच्या नावावर पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले आणि अनुक्रमे 27, 28, 29 आणि 30 मार्च रोजी त्यांना एकूण ८.५ लाख रुपये दिले. अनेक वेळा ते पेमेंट करण्यात अडचण येत असल्याचेही सांगतात, ते समोरच्या व्यक्तीला त्यांच्या खात्यावर काही पैसे पाठवण्यास सांगतात आणि नंतर OTP इत्यादी माहिती घेऊन खात्यातील पैसे क्लिअर करतात, अशी माहिती पीडितीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT