Latest

तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन युवकाचा दुर्दैवी मृत्यू

अमृता चौगुले

मांडवगण फराटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. विश्वनाथ चौरंग चव्हाण ( वय वर्ष २८) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ हा शेती व्यवसायाबरोबरच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी रात्री कांद्याची गाडी भरण्यासाठी तो सायंकाळच्या सुमारास गेला होता. रात्री काम उरकून माघारी येत असताना रस्त्यावर तुटलेल्या विद्युत तारेचा त्यास शॉक लागला.

सकाळी या रस्त्यावर जाताना ही गोष्ट निदर्शनास येताच कुटुंबीयांना माहिती कळाली. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या घटनेबाबत घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र माने यांनी महावितरणची तार तुटल्यानेच युवकाचा प्राण गेला असून त्यास शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT