Latest

धक्कादायक! स्टँडला स्मार्टफोन लाऊन कॅमेरा ऑन करत तरूणाची आत्महत्या, जळगाव जिल्ह्यातील घटना

निलेश पोतदार

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा

शहरातील पिंप्राळा भागात राहणार्‍या (१७ वर्षीय) तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना (शुक्रवार) सायंकाळी घडली. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू करून त्याने आपल्या आत्महत्येचे चित्रीकरण स्मार्टफोनमध्ये करून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

घनश्याम संजय भोई (वय.१७ रा. पिंप्राळा हुडको जळगाव ) अस या तरूणाचे नलाव आहे. या तरूणाने शुक्रवार सायंकाळी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. घनश्याम भोई हा आई मंदाबाई, वडील, मोठी बहिण गीता भोई यांच्यासह सेट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा परिसर जळगाव येथे वास्तव्याला आहे. आईवडील आणि मोठी बहीण हे धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे मुळगावी नेरी पिंप्री जामनेर येथे गेल्याने तो घरात एकटाच होता.

शुक्रवारी २४ डिसेंबर रोजी त्याने राहत्या घरात गाणे लावून गळफास घेवून आत्महत्या केली. शेजारी राहणार्‍या महिलेला हा प्रकार लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. दरम्यान, शेजारच्यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलाने गळफास का घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, गळफास घेण्याआधी घनश्यामने समोर स्टँडला स्मार्टफोन लाऊन यातील कॅमेरा ऑन केला होता. यामुळे यात त्याच्या आत्महत्येची घटना रेकॉर्ड झाल्याचे पोलिसांना तपासणीत आढळून आले आहे. त्याने आत्मघाताचे पाऊल नेमके कशासाठी उचलले ? आत्मघात करत असतांना त्याने याचे रेकॉर्डिंग का केले? याची माहिती मात्र पोलिसांना मिळालेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT