Latest

Yog Gram : देशातील सर्वात मोठे आदर्श गाव खुर्सापार होणार ‘योग ग्राम’

backup backup
पुढारी वृत्तसेवा नागपूर, – Yog Gram : केंद्र सरकारतर्फे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक राज्यातून एका गावाची निवड करून ते गाव 'संपूर्ण योग ग्राम' म्हणून विकसित केले जाणार आहे. महाराष्ट्रातील २७,००० गावांतून हा मान खुर्सापार (ता. काटोल, जि. नागपूर) ग्रामपंचायतीला मिळाला आहे. खुर्सापार हे देशातील सर्वात मोठे आदर्श गाव आहे.
देशातील सर्वात मोठे आदर्श गाव खुर्सापार (ता. काटोल, जि. नागपूर) येथे भव्य आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माजी आमदार भाजप नेते डॉ. देशमुख यांनी शेतकरी आणि ग्रामीण महिलांसोबत योग करून  स्वस्थ आणि प्रगतीशील भारताचा संकल्प केला. यावेळी त्यांनी योगदिन विदर्भातील शेतकऱ्यांना समर्पित केल्याची भावना बोलून दाखविली. यावेळी सरपंच सुधीर गोतमारे आणि ग्रामस्थांनी योगसाधनेत भाग घेतला. Yog Gram
या आदर्श गाव पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केली असून या ग्रामपंचायतीला केंद्र आणि राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता 'संपूर्ण योग ग्राम' म्हणून खुर्सापारला विकसित केले जाणार आहे. तसेच येथे वर्षभर योगासंबंधी कार्यक्रम घेतले जाणार आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.
योगामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असून ते निरोगी जीवन जगत आहेत. शेतकरी, मजूर, अबाल वृद्ध, स्त्री, पुरुष, विद्यार्थी व समस्त नागरिकांचे निरोगी शरीर व दीर्घ आयुष्याकरिता दैनंदिन जीवनात योगसाधना अत्यंत उपयोगी आहे.
हे ही वाचा
SCROLL FOR NEXT