Latest

IPL 2023 मध्ये १५ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडून यशस्वी जैस्वालने रचला इतिहास

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 36 चेंडूत 50 धावा केल्या. या अर्धशतकीत 8 चौकार मारले. जैस्वालने आयपीएलच्या या मोसमात 13 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही केला होता. आता जैस्वालने आयपीएलच्या (IPL 2023) इतिहासात असा पराक्रम केला आहे, ज्यामुळे जयस्वाल आगामी काळात भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा बनू शकतो.

जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आयपीएलच्या (IPL 2023) इतिहासातील असा अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. त्याने आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. जैस्वालने 15 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. १५ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या शेन मार्शने आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. मार्शने 2008 च्या आयपीएल हंगामात एकूण 616 धावा केल्या होत्या, तर जैस्वालने या हंगामात 625 धावा करून विक्रम प्रस्थापित केला आहे.

जैस्वालने आयपीएलच्या या मोसमात 14 सामन्यात 48.08 च्या सरासरीने 625 धावा केल्या आहेत. या मोसमात जैस्वालने शतक झळकावण्याची अप्रतिम कामगिरी केली होती. याशिवाय या युवा फलंदाजाने आयपीएलमध्ये ५ अर्धशतकेही झळकावली आहेत. जयस्वालचे वय अवघे २१ वर्षे आहे आणि जगातील उत्कृष्ट फलंदाजही त्याच्या फलंदाजीमुळे थक्क झाले आहेत.

दरम्यान, देवदत्त पडिक्कल (51) आणि यशस्वी जैस्वाल (50) यांच्या अर्धशतकानंतर शिमरॉन हेटमायरच्या 46 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. या विजयामुळे राजस्थानचा प्लेऑफमधील प्रवेश सुकर झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने पाच गड्यांच्या मोबदल्यात 187 धावा केल्या. मात्र राजस्थानने दोन चेंडू राखून सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह राजस्थानचा संघ 14 सामन्यांत 14 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. तर पंजाब प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 14 सामन्यांमधला पंजाबचा हा आठवा पराभव आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT