Latest

XPoSat Mission | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रक्षेपित ISRO च्या मोहिमेचे आणखी एक यश; XSPECT पेलोडने सुपरनोव्हा अवशेषातून पहिला प्रकाश टिपला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक्सपोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. या मोहिमेला आता यश मिळाले असून, XPoSat मधील SPECT पेलोडने सुपरनोव्हा अवशेषातून पहिल्यांदाच प्रकाश टिपला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून आज (दि.११) दिली आहे. (XPoSat Mission)

भारताच्या पहिल्या एक्स-रे पोलरीमेट्रिक मिशनने कॅसिओपिया A (Cas A) सुपरनोव्हा अवशेषातून पहिला प्रकाश टिपला आहे. XPoSat या यानातील XSPECT चे स्पेक्ट्रल आणि टेम्पोरल हे पेलोड सॉफ्ट क्ष-किरणांमध्ये विश्वाची रहस्ये उलघडतील, असे देखील इस्रोने म्हटले आहे. (XPoSat Mission)

सोमवारी १ जानेवारी 2024 रोजी XPoSat हा भारताचा पहिला 'एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह' लॉन्च करण्यात आला होता. यामध्ये दोन सह-संरेखित साधने आहेत. POLarimeter Instrument in X-rays (POLIX) आणि X-ray SPECtroscopy and Timeing (XSPECT), ज्याचा उद्देश वैश्विक क्ष-किरण स्त्रोतांचे रहस्य उलगडणे हा आहे. यामधीलच XSPECT प्रकाश किरण टिपत मोहिमेतील पहिले यश मिळवले आहे. (XPoSat Mission)

भारताच्या एक्स-रे पोलरीमेट्रिक मिशनमध्ये वापरण्यात आलेले XSPECT पेलोड हे इस्रोच्या बंगळूर येथील यू आर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये विकसित केले आहे. XSPECT पेलोड हे सॉफ्ट एक्स-रे बँडमध्ये क्ष-किरण स्त्रोतांच्या सतत आणि दीर्घकालीन वर्णक्रमीय आणि तात्पुरत्या अभ्यासास सुरूवात केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT