Latest

xAI: ‘एक्स’ची एआय आवृत्ती आजपासून

मोनिका क्षीरसागर

लंडन : इलॉन मस्क यांच्या एक्सची खास एआय आवृत्ती शनिवारी उपलब्ध होणार आहे. फक्त निवडक लोकांनाच हे एक्स एआय उपलब्ध होणार असल्याने त्याची उत्सुकता ताणली गेली आहे.. लंडनमध्ये सुरू असलेल्या एआय परिषदेदरम्यान मस्क यांनी आपल्या एक्सची एआय आवृत्ती जारी करणार असल्याची घोषणा केली.

जगभरातील निवडक लोकांनाच ती सेवा उपलब्ध होणार असून, ते लोक कोण आहेत याबाबतही काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. एक्सएआय हे सध्या आस्तित्वात असलेल्या एआय मॉडेलमध्ये सर्वात उत्तम असल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. त्यांनी गेल्या जानेवारीतच एक्सच्या एआय आवृत्तीचे सुतोवाच केले होते.

टेसला आणि ट्विटरनंतर एलॉन मस्क यांनी आता आर्टिफिशियल तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन स्टार्ट अपची सुरुवात केली आहे.  'xAI' असं मस्क यांच्या नवीन स्टार्ट अपच नाव आहे. या संदर्भात ट्वीट करत त्यांनी नवीन स्टार्टअपची घोषणा केली. यामध्ये 'xAI' या कंपनीचे कार्यक्षेत्र मस्क यांच्या इतर कंपन्यांपेक्षा वेगळी असली तरी त्याच्यापासून या इतर कंपन्यांना अनेक फायदे मिळतील. हे स्टार्ट अप AI ला अधिकाधिक वास्तवतेशी जोडणार असेल हे देखील मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT