Latest

Wrestler Protest : बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांकडून संरक्षण

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांप्रकरणी जतंर-मंतरवर कुस्तीपटूंचे (Wrestler Protest) आंदोलन सुरू आहे. दरम्यान, कुस्तीपटू आणि तक्रारकर्त्यांना दिल्ली पोलीसांकडून सुरक्षा पुरवतील जाणार आहे. तसेच आंदोलनकर्त्यांचे जबाब नोंदवले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

WFI चे अध्यक्ष सिंग यांच्यावर सात महिला कुस्तीपटू आणि एका अल्पवयीन मुलीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. पोलीस आता या सात तक्रारदारांचे जबाब नोंदवणार आहेत. एफआयआरमध्ये नमूद केलेल्या घटना  2012 ते 2022 दरम्यान परदेशासह विविध ठिकाणी घडल्या (Wrestler Protest) आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय महिला प्रेस कॉर्प्सने बृजभूषण शरणसिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल चौकशीची मागणी करणाऱ्या आंदोलक महिला कुस्तीपटूंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती सरकारला केली. एका निवेदनात, IWPC महिला कुस्तीपटूंसोबत एकजुटीने उभे असल्याचे म्हटले आहे.  त्यांनी महिला खेळाडूंच्या कोणत्याही प्रकारच्या छळाचा आणि लैंगिक शोषणाचा निषेध (Wrestler Protest) केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी(दि.२८) गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT