Latest

जागतिक हास्य दिन : स्माईल प्लिज…’स्ट्रेस’ रिलीज…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

हसताय ना…हसायलाच पाहिजे हे वाक्‍य तुम्ही ऐकलं असेलच णि ते खऱही आहे. आपण स्वत: हसायला हवेच आणि दुसऱ्यांनाही हसवायला हवे; पण सध्याच्या घडीला आपण हसणं विसरत चाललाेय का?  प्रश्न तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर बहुतांश जणांच उत्तर  याचं 'हो' असे येईल. बदलती जीवनशैली, स्पर्धेत टिकुन राहण्यासाठीची धावपळ, मागील दाेन वर्षांपासून जागतिक महामारीमुळे वाढलेला ताण-तणाव यात आपण आपलं नैसर्गिक हास्‍य  विसरुन चाललाे आहोत; पण याचा  परिणाम आपल्या शरीरावर होताेय. हसण्याचे बरेच फायदे असतात. ते आपण समजून घेणे गरजेचे आहे. हे समजले की, आपल्या आयुष्यात आनंदचं आनंद आहे. चला तर मग जागतिक हास्य दिनानिमित्त हसण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेवूया.

जागतिक हास्य दिन : हसा आणि निराेगी रहा

मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. हसण्यामुळे माणसाला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सहानुभूतिपूर्ण दुःखाचे प्रतिऔषध, अशी हास्‍याची व्‍याख्‍या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ  विल्यम मॅक्डूगल यांनी केली आहे.

  • हसल्‍यामुळे नकारात्मकतेची तीव्रता कमी हाेते.  सकारात्मक वाढते. मनात सकारात्मक विचार मनात येतात.
  • अलिकडच्या काही दिवसात ताण-तणाव वाढत असल्याचे दिसतं आहे; पण तुम्हाला माहित आहे का? हसण्याने आलेला ताण-तणाव निघुन जातो.
  • हसण्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे. त्यांनी तर हसायलाच हवे. हसण्याने ह्रदयावरील ताण कमी होताे.
  • जेव्हा तुम्ही हसता तेव्हा शरीरात एंडोर्फिस हा फिल गुड करणार हार्मोन कार्यशील हाेते. त्‍यामुळे अवयव दुखतात ते कमी होतात.
  • वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. काही संशोधनात आढळून आले आहे की माणूस ताण-तणावात खूप खातो; मग वजन वाढत जाते. जर ताणतणाव नियंत्रणात ठेवला तर वजनवाढही नियंत्रणातही राहील.
  • हसण्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे अभिसरण प्रक्रिया वाढते आणि दूषित हवा काढून टाकते.
  • हसणं तुमचं आजार दूर ठेवण्यास मदत करते.

चला तर मग हसूया आणि हसवुया

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT