Latest

World Chess Championship : डिंग लिरेनचा बाराव्या फेरीत सनसनाटी विजय!

Shambhuraj Pachindre

अ‍ॅस्ताना; वृत्तसंस्था : चीनच्या डिंग लिरेनने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या 12 व्या फेरीत सनसनाटी विजय मिळवला असून यामुळे स्पर्धेत रंगत आली आहे. बाराव्या फेरीअखेर डिंग लिरेन व रशियाचा इयान नेपोम्नियाची या उभय आव्हानवीरांच्या खात्यावर प्रत्येकी 6 गुण झाले आहेत. या स्पर्धेत एकूण 14 डाव खेळवले जाणार असून सर्वप्रथम 7.5 गुण संपादन करणारा ग्रँडमास्टर नवा जगज्जेता असणार आहे. शक्तिशाली चेस इंजिनच्या जमान्यात या डावात मानवी तार्किक खेळाची प्रचिती रंजकपणे आली. (World Chess Championship)

पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळताना डी 4, एनएफ 3, ई 3, बीडी 3, सी 3 अशा चाली होतात, त्यावेळी त्याला कोले सिस्टीम ओपनिंग म्हणून ओळखले जाते. एडगार्ड कोले या बेल्जियम बुद्धिबळपटूने या ओपनिंगचा शोध लावला तर जॉर्ज कोल्तानोस्कीने ही ओपनिंग लोकप्रिय केली. यापूर्वी, 2016 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आठव्या डावात मॅग्नस कार्लसनने पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळताना कोले-झुकरटोर्ट सिस्टीमचा अवलंब केला. मात्र, त्याला सर्जेई कर्जाकिनविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. (World Chess Championship)

दरम्यान, अ‍ॅस्ताना येथे सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत वास्तविक, नेपोने 12 व्या डावात उत्तम खेळ साकारला. पण दुहेरी चुकांमुळे त्याला 37 वी चाल करण्यापूर्वीच पराभव मान्य केला. डावाच्या दुसर्‍या टप्प्यात नेपोकडून ब्लंडर झाले आणि याचा डिंग लिरेनला उत्तम लाभ घेता आला. नेपोने 26 व 28 व्या चालीला मोठ्या चुका केल्याचे चेस इंजिन्सनी दर्शवले. या दोन चालींपूर्वी लिरेन पटावरील स्थिती व हाताशी उपलब्ध असलेला वेळ या दोन्ही आघाड्यांवर पिछाडीवर होता. नेपोच्या दुहेरी ब्लंडरनंतर मात्र सारीच परिस्थिती बदलून गेली.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT