पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना काळानंतर अंतरराष्ट्रीय पातळीवर बदलेले कामाचे स्वरूप हा खूप मोठा बदल आहे. जगभरातील कोट्यावधी कंपन्यांनी कोरोना काळात घरी राहून काम (WFH) करण्याची दिलेली संधी ही कामाची नवी पद्धत प्रचलित झाली. या नवीन युगात प्रवेश केल्यानंतर अनेक कंपन्या कामाचे नवनवे प्रयोग करताना दिसून यायला सुरू झाले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात सुरू झालेली ही पद्धत आगामी काळातील मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालणाऱ्या कंपन्यांनी ही पद्धत कायमस्वरूपाची केली. वर्क फ्रॉम म्हणजे घरून काम करणे अशी संकल्पना आहे. ही पद्धत रूढ झाली आहे. परंतु आता वर्क फ्रॉम या पद्धतीच्या पुढचे पाऊल टाकत नवी संकल्पना ब्रिटनमध्ये सुरू झाली आहे. ब्रिटिश पब मालकांनी आणि आता 'वर्क फ्रॉम पब' (Working From Pub) ही सुविधा देण्यास सुरूवात केली आहे.
द गार्डियन मध्ये दिलेल्या माहितीनुसार, "लॅपटॉप वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करत असताना घरातील लाईट बिलातून सुटका मिळावी यासाठी येथील पबने ही सुविधा आणलेली आहे. याकरिता पबची वाढती संख्या वाढविण्यात आली आहे. वर्क फ्रॉम पब (Working From Pub) संकल्पनेची ऑफर पब चालकांनी आता कर्मचाऱ्यांना दिली आहे.
380 पबनी फुलर्स चैनच्या माध्यमातून WFP या कराराची ऑफर दिली आहे. यामध्ये दिवसाला ११ डॉलर रूपये इतका मोबदला आकारला जाईल. पण यंग्सने 185 पबमध्ये १७ डॉलरमध्ये खाण्या-पिण्याच्या सुविधा दिली आहे. यामध्ये एका पबला दुसऱ्या पबशी संपर्क ठेवून काम करावे लागते. जेवणामध्ये सँडविच, चहा आणि कॉफी याचा समावेश असतो.
द गार्डियनने दिलेल्या माहितीनूसार "या पबच्या ग्राहकाला म्हणजेच वर्क फ्रॉम पब सुविधेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला यंग्स पबने त्याला एक टेबल, बेकन सँडविचसह मोफत अमर्यादित चहा आणि कॉफीची सुविधा ठेवली आहे."
हेही वाचा