Latest

Womens T20 WC Final : द. आफ्रिकेच्या महिला खेळाडूने अनोखा विक्रम केला आपल्या नावावर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया यजमान दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. मात्र, याआधी महिला क्रिकेटमधील नवा विक्रम घडला आहे. आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने ( Womens T20 WC Final ) महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकून नवा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शबनमने ही कामगिरी केली आहे.

शबनमने ताशी ८० मैल म्हणजेच ताशी १२८ किलोमीटर वेगाने बॉल टाकला होता. जो महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू मानला जात आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही; पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीत आफ्रिकेने ६ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. प्रथमच महिला टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Womens T20 WC Final)

लॉरा-ताझमीनची शानदार खेळी

उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध ४ बाद १६४ धावा केल्या. लॉरा वोल्वार्डच्या ५३ आणि ताजमिन ब्रिट्सच्या ६८ धावांच्या अर्धशतकी खेळीनंतर, मारिजने कॅपने शेवटच्या षटकात नाबाद २७ धावा फटकावल्‍या.
इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने तीन विकेट घेतल्या. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सूनलुसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत केवळ 158 धावा करू शकला. यजमानांकडून खाकाने चार तर शबनम इस्माईलने तीन बळी घेतले. इंग्लंडकडून नॅट सायव्हर-ब्रंटने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT