पुढारी ऑनलाईन: संसदेच्या विशेष अधिवेशनात आज (दि.२१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नारीशक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानत लाेकसभेच्या कामकाजाला सुरूवात केली. (Women's Reservation Bill)
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बुधवार, २० सप्टेंबर राेजी लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर झाले. हा दिवस भारताच्या संसदीय प्रवासाचा सुवर्णक्षण होता. या सभागृहातील सर्व सदस्य त्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार आहेत. नारीशक्ती विधेयकाला पाठींबा देत, महिला आरक्षणाला समर्थन दिल्याबद्दल मी तुमचे सर्वाचे मन:पूर्वक आभार मानतो. (Women's Reservation Bill)
बुधवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक ४४५ मतांनी मंजूर झाले. आता जेव्हा आपण राज्यसभेमध्ये हा विधेयकाचा शेवटचा टप्पा पार करू तेव्हा देशाच्या स्त्री शक्तीमध्ये होणारे परिवर्तन त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा विश्वास ही एक अकल्पनीय आणि अभूतपूर्व शक्ती म्हणून उदयास येईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (Women's Reservation Bill)
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (दि.१९ सप्टेंबर) महिला आरक्षण विधेयक मांडत, नवीन संसद भवनाचा श्रीगणेशा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नारीशक्ती वंदन विधेयकाची' सभागृहात घोषणा केली. यानंतर बुधवारी (दि.२० सप्टेंबर) हे विधेयक चर्चेसाठी लोकसभा सभागृहात ठेवण्यात आले. ते बहुमताने लोकसभेत मंजूर झाले. (Women's Reservation Bill)