Latest

Wrestlers Protest: महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषणविरुद्ध छायाचित्रे, व्हिडिओ सादर करावीत

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा (Wrestlers Protest) आरोप केला आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. आता महिला कुस्तीपटूंना ब्रिजभूषण यांच्याविरूद्ध छायाचित्रे, व्हिडिओ किंवा व्हॉट्सअॅप चॅट्स सादर करण्यास पोलिसांनी सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी स्वतः पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलिसांनी सीआरपीसी ९१ ची नोटीस जारी केली. जी तपास अधिका-यांना तक्रारींवरील केसशी संबंधित कोणतीही कागदपत्रे मागवण्याचा अधिकार देते आणि केसशी संबंधित कोणतेही पुरावे त्यांना देण्यास सांगते.

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी एका खास मुलाखतीत आंदोलकांचा पोलिसांच्या तपासावर विश्वास नसल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की, भाजप खासदाराला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ते तुरुंगाबाहेर असल्याने तपासात अडथळे येत आहेत. बजरंग पुनिया म्हणाले, पोलीस एका महिला कुस्तीपटूला भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यालयात घेऊन गेले. ब्रिजभूषण सिंह उपस्थित असतानाही त्या महिलेला खोटे सांगितले की ते उपस्थित नाहीत. त्यामुळे ब्रिजभूषण सिंगला वाचवले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

ऑलिम्पियन साक्षी मलिकने सांगितले की, ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये सात महिला अल्पवयीन होत्या. दबावाखाली त्यांनी आपले विधान बदलले आहे. बृजभूषण सिंग यांनी तक्रारकर्त्यांना फोन करून धमकावल्याचा आरोप करताना त्यांनी सांगितले की, आमच्यावर तडजोड करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. घटनेच्या वेळी अल्पवयीन महिला पैलवानाचे वय नव्हते. त्यामुळे त्यांनी कोर्टात नवीन जबाब नोंदवला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT