Latest

women world cup 2022 : पाकिस्तानच्या विजयाने भारताला सेमीफायनलची संधी

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकाच्या (women world cup 2022) दरम्यान जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानचा सामना रंगत असतो तेव्हा टेलिव्हिजनवर मौका…मौका… ही जाहिरात नेमकी दाखवली जाते. यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा चाहता आपल्या संघाचे जर्सी घालून आपल्या संघाला कशी संधी आहे याबाबतची ही जाहिरात आहे. भारत नेहमी विश्वचषकात पाकिस्तानला नमवत आला आहे त्यामुळे दरवेळी पाकिस्तानच्या चाहत्याला वाटते की यावेळी आपल्या संघासाठी मौका आहे. पण, सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषकाच्या स्पर्धेत पाकिस्तान संघामुळे भारतीय संघाला चांगलाचा मौका मिळाला आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला नमवल्यामुळे सेमीफायनलाचा भारताचा मार्ग अगदीच सोपा झाला आहे.

महिला क्रिकेट विश्वचषक (women world cup 2022) स्पर्धेत भारतीय संघ मंगळवारी सहावा सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हॅमिल्टन येथे रंगणार आहे. गेल्या दोन सामन्यातील पराभवानंतर हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.

पाकिस्तानच्या विजयाचा फायदा भारताला (women world cup 2022)

महिला विश्वचषकात आज वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे वेस्ट इंडिज संघाची धावगती पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा रन रेट वेस्ट इंडिजपेक्षा खूपच चांगला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध विजय मिळाला तर उपांत्य फेरीचा मार्ग थोडा सोपा होईल.

बांगलादेशविरुद्ध १०० टक्के रेकॉर्ड (women world cup 2022)

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत फक्त 4 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत आणि या सर्व सामन्यात टीम इंडिया जिंकली आहे. या दोघांमधील शेवटचा सामना 5 वर्षांपूर्वी 2017 मध्ये झाला होता, जो भारताने 9 विकेट्सने जिंकला होता. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.

पूनमला संधी मिळणार ? 

पूनम यादवला या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र ती भारतासाठी बांगलादेशविरुद्धची मॅच विनर ठरू शकते. लेगब्रेक स्पिनर पूनम यादवने 57 एकदिवसीय सामन्यांमध्ये 79 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने विश्वचषकातील 9 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यात तिने 3 बळीही घेतले होते. मिताली राजला या महत्त्वाच्या सामन्यात पूनमवर बाजी मारायला नक्कीच आवडेल.

बांगलादेशने ४ पैकी ३ सामने गमावले

बांगलादेशने या स्पर्धेत 4 सामने खेळले असून 1 जिंकला आहे. संघाला 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बांगलादेश या विश्वचषकात मोठा धक्का दिला आहे. या संघाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 9 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे भारताविरुद्धही बांगलादेश चाहत्यांना चकित करू शकतो.

हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक सकाळी 6 वाजता होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT