Latest

छत्तीसगडमधील महिलांना प्रतिवर्ष १५ हजारु रुपयांची आर्थिक मदत : काँग्रेसचे मोठे आश्‍वासन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. या रणधुमाळीत आज काँग्रेसने राज्‍यातील महिलांना मोठे आश्‍वासन दिले. पुन्‍हा सत्तेत आल्‍यास राज्‍यातील महिलांना वार्षिक १५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले. ( Chhattisgarh Assembly polls )

विवाहित महिलांना प्रतिवर्षी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्‍वाही भाजपने आपल्‍यान निवडणूक जाहीरनाम्यात दिली आहे. आता काँग्रेस प्रतिवर्षी १५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत माध्‍यमांशी बोलताना मुख्‍यमंत्री भूपेश घेल यांनी सांगितले की, "आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर, राज्यातील महिलांना "छत्तीसगड गृह लक्ष्मी योजने" अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात १५ हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाईल." ( Chhattisgarh Assembly polls )

छत्तीसगडमध्‍ये विधानसभेच्‍या ९० जागांपैकी 20 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला पार पडले. उर्वरित 70 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.


हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT