Latest

गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक; 1 लाख 14 हजार 250 रुपयांचा चार किलो 570 ग्रॅम गांजा जप्त

अमृता चौगुले

पिंपरी : गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली. तिच्याकडून चार किलो 570 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी २ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास कावेरीनगर भाजी मंडईजवळ ही कारवाई करण्यात आली.

सुरेखा संतोष सुकळे (35, रा. कावेरीनगर भाजी मंडई जवळ, झोपडपट्टी वाकड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरीनगर भाजी मंडई जवळ रस्त्याच्या कडेला एक महिला गांजा विकत होती. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, पथकने सापळा लावून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपी महिलेकडून एक लाख 14 हजार 250 रुपयांचं चार किलो 570 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

SCROLL FOR NEXT