Latest

जळगाव : बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, १३ प्रवासी जखमी, मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

स्वालिया न. शिकलगार

जळगाव – पुढारी वृत्तसेवा : सप्तशृंगी गडावरील घाटात एसटी बसचा अपघात झाला. यात अमळनेर तालुक्यातील १ महिला ठार झाली असून, १३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांची मदत व नातेवाईकांना विचारपूस करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात मदत संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येथील एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १३ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमींवर नाशिक जिल्हा रूग्णालय व वणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या अपघातात मुडी (ता. अमळनेर) येथील आशाबाई राजेंद्र पाटील (वय-५५) यांचा मृत्यू झाला आहे‌.

यात जखमींमध्ये प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर (वय ६५), संजय बळीराम भोईर (वय ६०), सुशिलाबाई सोनु बडगुजर (वय ६७), वत्सलाबाई साहेबराव पाटील (वय ६५), सुशिलाबाई बबन नजान (वय ६५), विमलबाई भोई वय ५९), प्रतिभा संजय भोई (वय ४५), जिजाबाई साहेबराव पाटील (वय ६५), संगिता बाबुलाल भोई (वय ५६), रत्नाबाई (आडनाव सांगितले नाही), सुरेखाबाई हिरालाल बडगुजर (वय ५३), भागीबाई माधवराव पाटील (वय ५२), संगिता मंगिलाल भोई (वय ५६, सर्व रा, मुडी ता. अमळनेर) तसेच भोकर, ता‌. जि.जळगाव येथील रघुनाथ बळीराम पाटील (वय ७०), बाळू भावलाल पाटील (वय ४८) यांचा समावेश आहे.

मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना 

जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी अमळनेर येथे स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात संदीप पाटील – 9834236436 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अमळनेर तहसीलदार रूपेश सुराणा यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT