Latest

Anil Parab on Kirit Somaiya : रामदास कदमसह दोन्ही मुलांना तुरुंगात टाकणार का?: अनिल परबांचा सोमय्यांवर निशाणा

अविनाश सुतार

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : कोकणातील साई रिसॉर्ट प्रकरणावरून सुरू झालेली भाजप नेते किरीट सोमय्या व ठाकरे शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यातील लढाई थांबताना दिसत नाही. आज या लढाईने एक वेगळे वळण घेतले असून परब यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते रामदास कदम व त्यांच्या दोन्ही मुलांवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी आपण किरीट सोमय्या यांनी याबाबत माहिती देणार असून ते या प्रकरणांची चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकणार का? असा सवाल देखील परब यांनी उपस्थित केला आहे. Anil Parab on Kirit Somaiya

अनिल परब यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, रामदास कदम शिवतेज संस्थेचे अध्यक्ष असताना विरोधीपक्ष नेते देखील होते. त्यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करून खोटे दाखले, खोट्या परवानग्या काढून हरित पट्ट्यात असलेली खेड नगर पालिका हद्दीतील भूखंड लाटला आहे. त्या जागेवर त्यांनी पूर नियंत्रण रेषेच्या नियमांचे उल्लंघन करून इमारतीचे बांधकाम केले आहे. हा भूखंड प्रथम नऊ वर्षासाठी व त्यानंतर ९९ वर्षासाठी पालिकेकडून भाडे कराराने देण्यात आला आहे. Anil Parab on Kirit Somaiya

या प्रकरणाची सर्व कागदपत्रे मी महाराष्ट्रातील स्वतःला तथा कथित अण्णा हजारे म्हणवणारे किरीट सोमय्या यांचेकडे पाठवत आहे. त्या सोबतच खेडमधील जांबुर्डे येथे रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम आणि सिद्धेश कदम यांच्या नावे १५ गुंठे जमीन होती. मुंबई – गोवा महार्गाच्या बांधकामासाठी या जमिनीचे सरकारकडून भूसंपादन करण्यात आले. जमीन १५ गुंठे असताना कदम यांनी १८.५ गुंठे जमिनीचा मोबदला घेतला. जमीन संपादित झालेली असताना आता त्यांनी त्याच जमिनीची अकृषक परवानगी मागितली आहे.

याबाबत आम्ही जिल्हाधिकारी व सक्षम यंत्रणांकडून चौकशीची मागणी करणार आहोत. रामदास कदम यांनी फार मोठा पुढाकार साई रिसॉर्ट प्रकरणी घेतला होता. त्यामुळे त्याच कदम यांचे हे दोन घोटाळे सध्या आम्ही किरीट सोमय्या यांच्याकडे देत आहोत. हिंमत असेल तर सोमय्या यांनी मला वेळ द्यावा. मी त्यांना ही प्रकरण समजावून देखील सांगेन. पण त्यांनी रामदास कदम व त्यांच्या दोन्ही मुलांना आत टाकून दाखवावे. यापुढे रामदास कदम यांचे १२ ते १३ घोटाळे बाहेर काढणार असून जे काचेच्या घरात असतात. त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, हे रामदास कदम विसरले. त्यामुळे आगामी काळात अनेक प्रकरण पुढे येतील, असे परब म्हणाले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT