Latest

WI vs IND 2nd ODI : वेस्टइंडिजने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध वेस्टइंडिज एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज (दि.२९) केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला जाईल. दरम्यान, वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. तर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर असणार आहे.

वेस्टइंडिजचा संघ – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अलिक अथानाझे, शे होप (यष्टीरक्षक), शेमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स

भारतीय संघ – शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT