Latest

PM Modi America Visit : नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते का आहेत? जाणून घ्‍या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ रिपोर्टमधील कारण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सोशल मीडियावर सुमारे नऊ कोटी फॉलोअर्स असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी मानले जातात. पंतप्रधान मोदी इतके लोकप्रिय का आहेत? याचे कारण अमेरिकेतील दैनिक न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये दिले आहे. ( PM Modi America Visit ) जाणून घेवूया या लेखात पंतप्रधान मोदींच्‍या लोकप्रियतेचे काय कारण दिले आहे याविषयी…

PM Modi America Visit : भारतातील जनतेवर मोदींचा मोठा प्रभाव

'न्यूयॉर्क टाईम्स'मध्‍ये मुजीब मशाल यांनी आपल्या लेखात लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बात कार्यक्रमामुळे स्थानिक लोकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळते. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मोदी देशात होत असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या सकारात्मक बदलांबद्दल बोलतात. नरेंद्र मोदी हे हे केवळ जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान आहेत म्हणून लोकप्रिय नाहीत तर देशातील लोकांवर त्यांचा खूप प्रभाव असल्‍याचे मुजीब मशाल यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान मोदी देशातील नागरिकांना जागरूक करतात

मन की बात या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या विशालतेत स्वतःला सर्वव्यापी बनवले आहे. या कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण टाळण्यासाठी टिप्स देतात. तसेच श्रोत्यांना हे देखील सांगतात की, ते स्वतः एक सामान्य शैक्षणिक पार्श्वभूमीतून आले आहेत. ते देशातील जलसंधारणवर बोलताता तसेच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीच्‍या आव्‍हानांबद्दल जागरूक करतात, असेही या लेखात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

PM Modi,America Visit : मोदी यांच्‍या पक्षाची सोशल मीडियावर मजबूत पकड

मुजीब मशाल यांनी आपल्‍या लेखात लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या लोकप्रियतेवर त्यांच्या पक्ष भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे. मोदी यांच्‍या पक्षाची सोशल मीडियावर मजबूत पकड आहे. पक्षाकडून नरेंद्र मोदी यांच्‍या भाषणांचे व्हिडिओ आणि मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केले जातात, असेही त्‍यांनी आपल्‍या लेखात म्‍हटले आहे.

पंतप्रधान मोदी देशवासियांशी जोडण्यात सक्षम

पीएम मोदी यांना देशाबद्दलची तळागाळातील समज आणि त्यांची क्षमता. या वैशिष्ट्यांमुळे पंतप्रधान मोदी देशवासियांशी जोडण्यात सक्षम आहेत.त्यांच्या सरकारच्या मोफत रेशन आणि पायाभूत सुविधांसारख्या योजना प्रभावीपणे जनतेसमोर ठेवू शकतात. कोरोना महामारीच्या काळातही पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमातून लोकांना लसीकरणासाठी प्रेरित केले, असेही या लेखात नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT