Latest

Smartphone camera : स्मार्टफोनचा कॅमेरा डाव्या बाजूलाच का असताे?

Arun Patil

नवी दिल्ली : स्मार्टफोन Smartphone camera हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. लोक एक वेळ आरशात पाहणे विसरतील; पण मोबाईलमध्ये पाहणे काही विसरणार नाहीत. 'कॉल करणे व घेणे' इतकेच स्मार्टफोनचे काम मर्यादित नाही. वेगवेगळी कामे करणारे हे एक बहुपयोगी उपकरण आहे. त्यामध्येच कॅमेराही असल्याने हवे त्यावेळी फोटो काढता येतात किंवा शूटिंग करता येते. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का, स्मार्टफोनच्या डाव्या बाजूलाच त्याचे कॅमेरे का असतात?

सुरुवातीला बहुतांश लोकांकडे छोटे फिचर फोन असायचे. त्यानंतर हळूहळू स्मार्टफोन Smartphone camera बाजारात येऊ लागले. या फोन्समध्ये कॅमेरा मध्यभागी होता; पण नंतर हळूहळू सर्वच कंपन्यांनी कॅमेरा मोबाईलच्या डाव्या बाजूला वळवला. दिग्गज स्मार्टफोन कंपनी 'अपल'ने सर्वप्रथम आपल्या आयफोनमध्ये डाव्या बाजूला कॅमेरा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू बहुतांश कंपन्यांनी हाच पॅटर्न स्वीकारला आणि कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला शिफ्ट केला.

कॅमेरा डाव्या बाजूला ठेवणे यामागे केवळ डिझाईनचे कारण नसून, अन्यही कारणे आहेत. जगातील बहुतांश लोक डाव्या हाताने मोबाईल Smartphone camera वापरतात. अशा स्थितीत मोबाईलच्या मागे टाव्या बाजूला बसवलेल्या कॅमेर्‍याने फोटो काढणे किंवा व्हिडीओ बनवणे सोपे जाते. याशिवाय मोबाईल फिरवून लँडस्केप मोडमध्ये फोटो काढताना मोबाईलचा कॅमेरा वरच्या बाजूला राहतो, त्यामुळे लँडस्केप मोडमध्येही फोटो सहज काढता येतो. या कारणामुळे मोबाईलमधील कॅमेरा डाव्या बाजूला ठेवला जातो.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT