Latest

राऊतांना धमकीचे फोन आले हे सांगण्यास चोवीस तास का लागले? : शंभूराज देसाई

निलेश पोतदार

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये शाब्दिक हल्ले सुरू आहेत. यातच संजय राऊत बडबड करत आहेत. सीमावादाच्या प्रश्नी त्यांना कधी चार दिवस जेल झाली आहे का? संजय राऊत यांनी वाचाळ बडबड बंद करावी, असा शब्दांत हल्‍लाबोल शंभूराज देसाई यांनी केला. तुम्हाला धमकीचे फोन आले हे सांगण्यास चोवीस तास का लागले? असा सवालही शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत राऊतांना केला.

गुजरात निवडणुकीच्या निकालास प्रारंभ झाला आहे. त्यावर बोलताना देसाई म्हणाले, कितीही कुणी यात्रा काढल्या, कुणाच्या पाठीमागे राहायचं प्रयत्न केला, कुणाच्या हातात हात घालून चालला तरी काही फरक पडत नाही. हे आजच्या निकालानंतर स्पष्ट होईल असा टोला देसाईंनी राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्‍या मारला.

देसाई म्हणाले, संजय राऊत यांनी त्यांची वाचाळ बडबड बंद करावी. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे धाडस नाही. हे यापुर्वीच सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. आता चोवीस तासांनंतर राऊत म्हणतात मला धमकीचे फोन आले. त्यांना माध्यमांच्या समोर येऊन सांगायला चोवीस तास का लागले? असा सवालही देसाईंनी केला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT