Latest

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक का करत आहेत?

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकात म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.  काही हल्लेखोरांनी म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेसवरदगडफेक केली आहे. यात एक्स्प्रेसच्या दोन खिडक्यांच्या काचा फोडल्या गेल्या आहेत. ही घटना आज (दि.२६) कृष्णराजपुरम आणि बेंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या हल्ल्यात कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. (Vande Bharat Express)

अलीकडे वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागात जानेवारी २०२३ मध्ये रेल्वे संरक्षण दलाने (RPF) दगडफेकीच्या २१ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये १३ प्रकरणे नोंदवली आहेत. देशाच्या इतर भागांतूनही अशाच घटना घडल्या आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT