Latest

Huge Idols : भारतातील महाकाय मुर्ती चीनमध्येच का तयार होतात? 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या राजधानी हैदराबादमध्ये मागील आठवड्यातच अकराव्या आणि बाराव्या शतकातील महान हिंदू संत रामानुजाचार्य यांच्या प्रतिमेचं (Huge Idols) म्हणजेच 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चं अनावरण केलं. २१६ फूट उंच असणाऱ्या मुर्तीची डिझाइन भारतात करण्यात आली; पण पंचधातूची ही मुर्ती प्रत्यक्षात चीनमधून बनवून घेण्यात आली.

आता हीच मुर्ती चीनमधून बनवून घेण्यात आली असं नाही, तर गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल, संसदेतील महात्मा गांधी, तेलंगणातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, या मुर्तींसाठी चीनचीच मदत भारताला घ्यावी लागली. नव्हे तर चीनमधूनच या मुर्ती तयार करून घ्यावा लागल्या आहेत.

भारतातील 'या' महापुरुषांच्या महाकाय मुर्ती चीनने तयार केल्या…

संत रामानुजाचार्य : 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चं म्हणजेच संत रामानुजाचार्य यांच्या मुर्तीची उंची २१६ फूट आहे. त्याचं डिझाईन भारतात तयार करण्यात आलं. या मुर्तीमध्ये तब्बल ७ हजार टन पंचधातू वापरलेले आहेत. आणि मुर्ती चीनकडून तयार करण्यात आली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं म्हणजेच गुजरात राज्यातील केवडिया गावातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुर्तीमध्येही चीन कंपनीचा हात आहे. या मुर्तीची उंची तब्बल ५९७ फूट इतकी उंच आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर : २०१७ मध्ये तेलंगणा सरकारने राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फुटाचा कांस्य धातूचा पुतळा तयार करण्याच्या उद्देशाने तत्कालिन उपमुख्यमंत्री कदियाम श्रीहरी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम चीनला पाठविण्यात आली होती.

मोठे पुतळे बनविण्यासाठी चीनच का? 

कांस्य धातुमध्ये पुतळे बनविण्यासाठी चीनने हातखंडा मिळविला असून संपूर्ण जगात त्यांना यासाठी ओळखले जाते.

पुतळ्याच्या कास्टिंगमध्ये चीनने पारंपरिक पद्धतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात पुतळे बनविले आहेत.

चीन पुतळ्याचे वेगवेगळे भाग पहिल्यांदा तयार करून घेते. हे भाग तयार करण्यासाठी चीनमध्ये मोठमोठे कारखाने आहेत.

मुर्तीचे वेगवेगळे भाग तयार केल्यामुळे मुर्ती लवकर तयार होते आणि त्याची डिलिव्हरीदेखील त्वरीत करता येते.

चीनमधील 'स्प्रिंग टेम्पल बुद्धा' हा विशाल पुतळाही चीनने तयार केली आहे. त्यामुळेच प्रत्येक जण आपल्या देशातील महापुरुषांचे पुतळे चीनकडून तयार करून घेतात. (Huge Idols)

भारतात का बनत नाहीत मोठे पुतळे? 

मुर्ती बनविण्याची पारंपरिक पद्धत भारतात खूप जुनी आहे. अनेक धातुंच्या मुर्ती भारतात तयार होतात आणि परदेशातही पाठविल्या जातात. भारतीय नागरिकांच्या प्रत्येक घरात या मुर्ती आपल्या पाहायला मिळातात. पण, महाकाय मुर्तीसाठी आपल्याला चीनकडेच आपल्याला जावं लागतं.

भारतीय शिल्पकारांच्या मते पुतळे बनविण्याच्या प्रोत्साहनाबद्दल राजकीय उदासीनता आढळते. हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी शासन पातळीवर कोणत्याही प्रकारचे अनुदान नसते.

व्हिडिओ पहा :सूर्यास्ताआधी मजुरांचे पैसे द्या, मजुरांनी अनुभवले मायाळू छत्रपती

हे वाचलंत का

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT