Latest

Wholesale inflation : घाऊक महागाईने ताेडला ३० वर्षांचा रेकाॅर्ड

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बॅंकेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात असताना घाऊक महागाईने मागील ३० वर्षांतील रेकाॅर्ड तोडले आहेत. 'पीटीआय'च्या अहवालानुसार घाऊक महागाई एप्रिल महिन्यात १५.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, ती मार्च महिन्‍यात  १४.५५ टक्के होती. एप्रिल २०२१ पासून घाऊक महागाईत दोन अंकांनी वाढ झाली आहे. ( Wholesale inflation)

खाद्य वस्तुंची महागाई : एप्रिलमध्ये खाद्य वस्तुंची महागाई ८.३५ टक्क्यांनी वाढली, जी मार्चमध्ये ८.०६ टक्के होती. इंधन आणि वीज महागाई एक महिन्‍यांपूर्वी  ३४.५२ होती, आता ३८.६६ टक्क्यांनी वाढलेली आहे. तयार केलेल्या वस्तुंची महागाई मार्चमध्ये १०.७१ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये १०.८५ टक्के झाली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने उचलले हे पाऊल : वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय रिझर्व्ह बॅंकेकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. मागील काही दिवसांपासून रिझर्व्ह बॅंकेने रेपोरेटमध्ये ०.४० टक्के वाढ केली होती. त्यानंतर रेपो रेट ४.४० टक्के झाला होता. आरबीआयकडून होम-कार लोनचे व्याज दरवाढ होत आहे. आरबीआय रिझर्व्ह बॅंकेने कॅश रिझर्व्ह रेशो वाढविण्याची घोषणा केली होती. (Wholesale inflation)

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT