Latest

‘आय लव्‍ह यू’ पहिला कोण म्‍हणणार ? विरोधी पक्षांच्‍या एकजुटीवर खुर्शीदांचा सवाल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील सर्व विरोधी पक्षांची लवकरात लवकर एकजूट झाली पाहिजे. बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्‍यमंत्री तेजस्‍वी यादव यांनी भाजपचा मुकाबला करण्‍यासाठी विरोधकांना एकत्र येण्‍याचे आवाहन केले आहे. तुम्‍हाला जे  हवे आहे तेच काँग्रेस पक्षालाही हवे आहे; पण कधी कधी प्रेमातही अडचण येते. आय लव्‍ह यू पहिला कोण म्‍हणणार, असा सवाल काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते सलमान खुर्शीद यांनी   केला.

नितीशकुमारांचे एकजुटीसाठी काँग्रेसला आवाहन

भाजपचा सामना करण्‍यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन नितीशकुमार यांनी आज (दि. १८ ) सीपीआय (एमएल) मेळाव्‍यात केले. ते म्‍हणाले, काँग्रेस पक्षाने विरोधकांना एकत्र आणण्‍यात आता उशीर करु नये. आम्‍ही वाट पाहत आहोत. याबाबत आम्‍ही दिल्‍लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. याच व्‍यासपीठावर असणार्‍या खुर्शीदांना नितीशकुमार म्‍हणाले की, तुमच्‍या माध्‍यमातून काँग्रेस नेतृत्त्‍वाला आम्‍ही एकजुटीचे आवाहन करतो. विरोधी पक्ष एकत्र आले तर आगामी २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा मिळवेल. बिहारमध्‍ये विरोधक एकजुटीसाठी काम करत आहेत. तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला हे आवाहन आहे, असे नितीशकुमार यांनी खुर्शीद यांना सांगितले.

खुर्शीदांनी केला सूचक सवाल

याला उत्तर देताना खुर्शीद म्‍हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्षांची लवकरात लवकर एकजूट झाली पाहिजे. बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्‍यमंत्री तेजस्‍वी यादव यांनी भाजपचा मुकाबला करण्‍यासाठी विरोधकांना एकत्र येण्‍याचे आवाहन केले आहे. तुम्‍हाला जे अहवे आहे तेच काँग्रेस पक्षालाहीहवे आहे;पण कधी कधी प्रेमातही अडचण येते. आय लव्‍ह यू पहिला कोण म्‍हणणार, असा सवालही त्‍यांनी केला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT