Latest

चिरंजीव की निष्ठावान? जिल्हा बँकेत बारामतीतून अजितदादा कोणाला देणार संधी?

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अचानक राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. गेली 32 वर्षे बँकेवर प्रतिनिधित्व करणार्‍या अजित पवार यांच्या जागी आता बारामतीतून कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. चिरंजीव पार्थ पवार यांना जिल्हा बँकेवर घेतले जाणार असल्याची चर्चा एकीकडे आहे, तर दुसरीकडे बदलत्या राजकीय समीकरणात निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असेही बोलले जात आहे. अजित पवार हे मअफ वर्ग मतदारसंघातून गेली 32 वर्षे बँकेचे प्रतिनिधित्व करतात.

संबंधित बातम्या :

अलीकडेच पवार राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्या या सरकारमधील उपमुख्यमंत्री पदाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या दिवशीच त्यांनी जिल्हा बँक संचालकपदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे त्यांच्या रिक्त जागी पार्थ पवार यांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, पार्थ हे कोणत्या विकास सोसायटीचे सभासद आहेत का, याची माहिती उपलब्ध झाली नाही. पवार कुटुंबीयातील कोणाला रिक्त जागी संधी देण्याऐवजी बदलत्या राजकीय समीकरणामुळे निष्ठावान कार्यकर्त्याला तेथे संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

SCROLL FOR NEXT