Latest

Payal Jadhav : कोण आहे शिपायाची लेक पायल जाधव? नागराज मंजुळेला मिळाला नवा चेहरा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागराज मंजुळेनं राजेश्वरी खरात, रिंकू राजगुरू या नव्या चेहऱ्यांना सुपरहिट केले. (Payal Jadhav) आता नागराजच्या चित्रपटाची नवी हिरोईन समोर आली आहे. पायल जाधव असं तिचं नाव असून ती शिपायाची लेक आहे. नागराजचा नवा चेहरा बापल्योक चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पायल जाधव हिच्याविषयी जाणून घेऊया. (Payal Jadhav)

पायलनेही हा चित्रपट आपल्यासाठी खूप खास असल्याचं सांगितलं आहे. या सिनेमाने आपल्याला नवीन वाट दाखवली असं ती म्हणाली. आता पायलची 'बापल्योक' मधली भूमिका प्रेक्षकांना कितपत पसंत पडते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्यांना नागराज मंजुळेच चित्रपटात नेहमीच संधी देतो. नवा चेहरा त्याच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. पिस्तुल्या, फँड्री, सैराट, झुंड, यासारख्या चित्रपटात नवे चेहरेच झळकले आहेत. आता नागराजने आपल्या बापल्योक या चित्रपटात पायल जाधव हिला संधी दिलीय.

पाण्याच्या समस्येमुळे पायलचे वडील गाव सोडून पुण्यात येऊन राहिले. सरस्वती विद्या मंदिर शाळेत ते शिपाई म्हणून काम करू लागले. पायलने त्याच शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ सायन्समधून पदवी घेतली. ललित केंद्रातून भरतनाट्यममध्ये पदवी मिळवली. आता ती बापल्योक या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, बापल्योक चित्रपटासाठी फ्रेश चेहरा ही कथेची गरज होती. पायलची निवड ऑडिशन घेतल्यानंतर झाली. पायलने या चित्रपटासाठी खूप कष्ट घेतले आहेत. तिने खूप आतम्विश्वासाने चित्रपटात काम केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT