Latest

Miss Universe 2023 : दिविता राय कोण आहे? मिस युनिव्हर्समध्ये भारताचे करतेय प्रतिनिधित्व!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ७१ वी मिस युनिव्हर्स स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. या आठवड्याच्या शेवटी ही स्पर्धा न्यू ऑरलियन्स (अमेरिका) मध्ये होईल. भारताची दिविता राय मिस युनिव्हर्स २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. (Miss Universe 2023) या स्पर्धेत जगभरातील ८४ महिला सहभाग घेणार आहेत. दिविता मिस दिवा युनिव्हर्स २०२२ ची विजेती ठरली आहे. दिविताला मागील वर्षी २८ ऑगस्ट रोजी मिस दिवा ऑर्गनायजेशनच्या १० व्या वार्षिक समारंभात हरनाज संधूने मिस दिवा युनिव्हर्स २०२२ चा मुकूट परिधान केला होता. (Miss Universe 2023)

स्टेजवर सोने की चिडिया बनून गेली दिविता

नॅशनल कॉस्च्यूम राऊंडसाठी दिविताने 'सोने की चिडिया' (सोन्यासारखे दिसणारे पंख) ही थीम डोळ्यांसमोर ठेवून त्यासारखे कपडे घालून स्वत:ला सादर केले. गोल्डन आऊटफिटसोबत गोल्डन पंख लावून दिविता मिस युनिव्हर्स स्टेजवर पोहोचली होती. डिझायनर अभिषेक शर्मानुसार, "हा राष्ट्रीय पोशाष भारताच्या सोन्याच्या चिमणीच्या रूपात एक अलौकिक, विविधतेसोबत सद्भावना, आध्यात्मिक आणि सोबतच आमच्या सांस्कृतिक समृद्ध संपत्तीचे प्रतीक सादर करतो."

स्टेजवर दिविता भारताची अर्थव्यवस्था, विविधता आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना खूप सुंदर दिसत होती. २५ वर्षांच्या दिविता रायने ऑगस्टमध्ये लिवा मिस दिवा युनिव्हर्स २०२२ जिंकले होते. १४ जानेवारीला ती ७१ व्या मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

कोण आहे दिविता राय?

दिविताचा जन्म १० जानेवारी, १९९८ रोजी मंगलोरमध्ये झाला. आता ती मुंबईत राहते. तिने कर्नाटकातील राजाजीनगरमधील नॅशनल पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती मुंबईला आली. तिने मुंबईतील सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून बॅचलर डिग्री घेतलीय. दिविता पेशाने एक मॉडल आहे. त्याचसोबत ती एक आर्किटेक्टदेखील आहे. दिविताला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळणं खूप आवडते. तिला पेटिंग आणि संगीतदेखील आवडते. दिविताचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात.

दिविता, सुष्मिता सेनला आपले आदर्श आणि प्रेरणा मानते. दिविता मानते की, सुष्मिताने भारतामध्ये अनेक मुलींना मिस युनिव्हर्सच्य़ा मंचापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा दिली आहे. दिविता आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेते. ती म्हणते- 'माझ्या वडिलांनी आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी शिक्षणाच्या शक्तीचा वापर केला. त्यांनी पैसे कमावण्यासाठी स्वत:ला सशक्त बनवलं आणि आमच्या परिवाराला मदत केली.'

SCROLL FOR NEXT