नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चालू पीकवर्षात केंद्र सरकारने अंदाज वर्तविल्यापेक्षा जास्त गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी आयुक्त पी. के. सिंग यांनी व्यक्त केला आहे. सरकारने चालूवर्षी 112.18 दशलक्ष टन इतके गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविलेला आहे.
देशाच्या काही भागात यंदा अवकाळी पाऊस पडला. त्याचा परिणाम गव्हाच्या दर्जावर होणार असला तरी उत्पादनात मात्र घट होणार नाही, असे सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गत पीकवर्षात 109.59 दशलक्ष टन इतके गव्हाचे उत्पादन झाले होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात यंदा गव्हाचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :