Latest

महिला आरक्षणाचं स्वागत, पण ओबीसींचे काय? : राहुल गांधी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसीसाठी मोदी सरकारने काय केले? असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ओबीसींसाठी बजेटमध्ये फक्त ५ टक्के तरतूद आहे. देशात ओबीसी लोकसंख्या किती, मोदी सरकारने स्पष्ट करावं. ३३ वर्षात ओबीसीमधून फक्त ३ सचिव झाले.

राहुल गांधी म्हणाले, महिला आरक्षणाचं स्वागत आहे. पण ओबीसींचे काय? महिला आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिलाच. पण लक्ष विचलित करण्यासाठी महिला आरक्षण आणलं गेलं. ओबीसींचा विकास हा केवळ मोदींचा खोटा दावा आहे. भाजपचे खासदार म्हणजे फक्त पुतळे, त्यांना अधिकार नाहीत. ओबीसी जनगणना करा. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी राहुल गांधींनी यावेळी मागणी केली.

SCROLL FOR NEXT