Latest

Petrol-diesel prices : बाहेरच्या राज्यात ‘पेट्रोल’चे दर किती आहेत? जाणून घ्या

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : Petrol-diesel prices : शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी गेल्या महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मागील महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील ५ रुपये तर डिझेलवर १० रुपयांची कपात केली. यानंतर अनेक राज्यांनीही दरात कपात केली. पण तरीही काही राज्यात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या आत आलेले नाहीत.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्यानंतर काही राज्यांनीही कर कमी केले आहेत. यात कर्नाटक, पाॅंडेचेरी, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, दादरा आणि गोवा, व केंद्रशासित प्रदेश यांनी पेट्रोलियम उत्पादनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर स्थानिक व्हॅट कमी केला आहे. नगर हवेली, दमण आणि दीव, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि लडाख यांचाही यात समावेश आहे.

या राज्यांनी कमी केले नाहीत व्हॅट

राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी व्हॅटच्या किंमती कमी केलेल्या नाहीत.

Petrol-diesel prices : आज बाहेरच्या राज्यात दर किती आहेत?

राज्य                                 लिटर दर 

नवी दिल्ली         –             ९५.४१ रुपये
पश्चिम बंगाल       –            १०४.६४ रुपये
कर्नाटक            –            १००.५८ रुपये
आंध्र प्रदेश         –              १०८.२० रुपये
राजस्थान          –              १०६.८९ रुपये
उत्तर प्रदेश       –              ९५. २८ रुपये
बिहार             –               १०६.१५ रुपये
पंजाब              –              ९४.२३ रुपये
तमिळनाडू      –              १०१. ५१ रुपये
मध्य प्रदेश       –             १११.६१ रुपये

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT