पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील (West Bengal) दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील एका वसतिगृहातील10 विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागून जखमी झाले आहेत. 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना काकद्वीप सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहिती नुसार, पश्चिम बंगालमधील (West Bengal) दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील एका वसतिगृहाच्या आत विद्युत तार तुटलेली होती, तारेत करंट येत होता. विद्यार्थांना तारेत करंट आहे याची कल्पना नव्हती. सर्व विद्यार्थी तारेच्या जवळ गेले असता 10 विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागला. यापैकी ५ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप वसतिगृहाच्या प्रशासनाने यावर अधिकृतरित्या काहीही माहीती दिलेली नाही. पुढीस तपास पोलिस करत आहे.