Latest

James Webb Space Telescope: ‘जेम्स वेब’ने बाह्यग्रहावर शोधला कार्बन डायऑक्साईड

Arun Patil

वॉशिंग्टन : अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा'ची सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बीण 'जेम्स वेब'ने अंतराळात जाऊन काही महिनेच झाले असले तरी या काळात ब्रह्मांडाची अनेक अद्भूत द़ृश्ये जगाला दाखवली आहेत. आता या दुर्बिणीने सौरमंडळाच्या बाहेरील एका ग्रहाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईडचा छडा लावला आहे. एखाद्या खडकाळ पृष्ठभागाच्या बाह्यग्रहावर अशा प्रकारचा शोध घेता येऊ शकेल जेणेकरून तिथे जीवसृष्टीचाही शोध घेता येईल असे संशोधकांना वाटते.

tify;">कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या नताली बटाला यांनी सांगितले की या शोधानंतरची माझी पहिली प्रतिक्रिया होती…शानदार! आता आपण अन्य ग्रहांच्या वातावरणाचाही अशाप्रकारे छडा लावू शकतो. या बाह्यग्रहाचे नाव 'वास्प-39' असे आहे. हा एक उष्ण वायूचा विशाल गोळा आहे. पृथ्वीपासून 700 प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या तार्‍याभोवती हा ग्रह प्रदक्षिणा घालतो. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध केली जाणार आहे.

फ्रान्सच्या अ‍ॅटोमिक एनर्जी कमिशनचे एक खगोल भौतिक शास्त्रज्ञ पियरे-ओलिव्हियर लागेज यांनी सांगितले की या शोधामुळे सुपरअर्थ म्हणजेच जे ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने मोठे पण नेपच्यूनपेक्षा लहान असतात अशा ग्रहांबाबतच्या किंवा पृथ्वीइतक्याच आकाराच्या बाह्यग्रहांच्या नव्या संशोधनाचे नवे दालन उघडणारे आहे. कार्बन डायऑक्साईडचा छडा लागल्याने आता 'वास्प-39' च्या उत्पत्तीबाबत जाणून घेण्यास आणखी मदत मिळेल असे 'नासा'ने म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT