Latest

Weather Report : विदर्भात पाऊसाची विश्रांती; ‘या’ भागात मात्र ‘यलो अलर्ट’

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदर्भातला पाऊस पूर्णपणे थांबला आहे. तेथे सोमवारपासून कोरडे वातावरण राहील. मात्र आता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सोमवार ते बुधवार असा तीन दिवस 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी मालेगावचा पारा राज्यात सर्वाधिक 41 अंशांवर गेला होता.

विदर्भात गेले पाच ते सहा दिवस अवकाळी पाऊस अन् गारपिटीने दाणादाण उडवून दिली. त्या भागातील किमान तापमान गेले पाच दिवस 30 ते 33 अंशांवर खाली आले आहे. उन्हाळ्यात गेल्या कित्येक वर्षांत प्रथमच विदर्भातले वातावरण थंड झाले आहे. त्या भागातील वार्‍याची चक्रीय स्थिती आता कोकण, मध्य महाराष्ट्राकडे वळाल्याने विदर्भातील पाऊस थांबला असून तो कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT