Latest

अ‍ॅपलचे नवीनतम ‘WatchOS 10’ तुमचा ‘मूड आणि इमोशन्सही’ ट्रॅक करणार; जाणून घ्या अधिक

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : 'WatchOS 10' : WWDC (वर्ल्डवाईड डेव्हलपर कॉन्फरन्स) कार्यक्रमात अ‍ॅपलने धमाकेदार फिचर्ससह प्रोडक्टस्ची नवीन रेंज लाँच केली. यामध्ये अ‍ॅपलचे नवीनतम 'Watch OS 10', मॅक प्रो, मॅक बुक एअर, टीव्हीओएस, मॅकओएस सोनोमा या प्रोडक्टसचा समावेश आहे. मात्र, या सर्व प्रोडक्टमध्ये 'Watch OS 10' आणि मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट या दोन प्रोडक्टसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. तर अ‍ॅपलच्या 'Watch OS 10' नवीन अ‍ॅप्स सह धमाकेदार नवीन फिचर्समुळे सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनले आहेत. जाणून घेऊया असं काय खास आहे या नवीन घड्याळमध्ये…

अ‍ॅपलने हे नवीन 'Watch OS 10' वापरकर्त्याला खास नवीन वेगळा अनुभव मिळावा अशा पद्धतीने डिझाईन केले आहे. यामध्ये विविध वैशिष्ट्यपूर्ण अ‍ॅप, नवा लूक, नवे डिझाईन, नवीन स्मार्ट स्टॅक आणले आहे. पॉवर मीटर, स्पीड सेन्सर्स, हे देखील नवीन फिचर्स लाँच केले आहेत. याशिवाय या घड्याळमध्ये पूर्णपणे नवीन ऑपरेटिंग सिस्टिम यामध्ये देण्यात आली आहे.

WatchOS 10 मध्ये इमोशन ट्रॅकिंग सपोर्ट

अ‍ॅपलच्या नव्याने लाँच केलेल्या या watch OS 10 मध्ये इमोशन आणि मूड देखील ट्रॅक करता येणार आहे. अशा प्रकारचे अपडेटेड फिचर या वॉचमध्ये देण्यात आले आहे.

Weather, Stocks, Home, Maps, Messages, World Clock यासारख्या Apple Watch अ‍ॅप्स आता डिस्प्लेचा अधिक वापर करतील. अ‍ॅपलने अ‍ॅपल वॉचवरील अ‍ॅक्टिव्हिटी ऍप आणि आयफोनवरील फिटनेस अ‍ॅपमध्ये दैनंदिन क्रियाकलापांचा मागोवा घेण्यासाठी सुधारणा केली आहे. 'Watch OS 10'

'WatchOS 10' मानसिक आरोग्य करणार 'मॉनिटर'

अ‍ॅपलचे हे नवीन घड्याळ आता तुमच्या मानसिक आरोग्यावर देखिल लक्ष ठेवणार आहे. घड्याळाच्या या ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन आवृत्तीमध्ये, तुम्ही तुमच्या क्षणिक भावना माइंडफुलनेस अ‍ॅपसह लॉग करू शकता. वापरकर्ते त्यांना कसे वाटत आहेत हे सूचित करण्यासाठी आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी डिजिटल क्राउनद्वारे विविध आकारांमधून स्क्रोल करू शकतात.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT