Latest

War Effects : युक्रेनमधले तळघर बनले प्रसूतिगृह

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: रशिया युक्रेन युद्धामध्ये सुरू असणाऱ्या संघर्षाची भयावह परिस्थिती युक्रेनमध्ये अडकलेल्या गर्भवती स्ञियांच्या या व्हायरल व्हिडिओमधून दिसून येत आहे. वारंवार तोफखान्यांचे आवाज, गोळीबार आणि बॉम्बफेकीचा गंभीर परिणाम हा याठिकाणी असलेल्या गर्भवती महिला , लहान मुले यांच्यावर होत आहेत. म्हणून, युक्रेनच्या रुग्णालयातील अधिका-यांनी त्यांची प्रसूती कक्ष, प्रसूती युनिट आणि नवजात अतिदक्षता विभाग हे भूमिगत ठेवण्याचा निर्णय घेतला. (War Effects)

https://twitter.com/i/status/1500071320746405893

या व्हायरल व्हिडिओमध्ये स्ञिया आपल्या बाळांना घेऊन जाताना दिसतात आणि त्यांना उबदार हवामानात ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही माता आपल्या मुलांना स्तनपान देत असताना, तर काही त्यांच्या झोपलेल्या नवजात बालकांना दूध पाजण्याच्या प्रक्रियेत दिसतात.

यादरम्यान, डॉक्टर आणि परिचारिका तळघरात हलवलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने उपचार करताना दिसतात. काही परिचारिका तिच्या हातात बाळासह घाईघाईने पायऱ्या उतरून जाताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सामान्य लोकांची संपूर्ण शोकांतिका दर्शविली गेली आहे. ज्यांचे जीवन एका दिवसात युद्धाने भयानक परिस्थितीच्या अथांग डोहात टाकले गेलेले आहे. एकीकडे, युद्धात बाळांना जन्म दिलेल्या या मातांना आणि त्यांच्या अपत्यांना किती त्रास सहन करावा लागतो याची साक्ष या व्हिडिओ रेकॉर्डिंग देतात, जे शब्दात मांडता येणार नाही. दुसरीकडे, कीव, ओडेसा, मारियुपोल आणि खार्किव यांसारख्या संपूर्ण युक्रेनमध्ये तळघरांना "बेसमेंट बर्थिंग वॉर्ड" म्हणून मिळालेली ओळख असे हे व्हिडिओ, त्यांच्या नव्या पिढीच्या भविष्याचे रक्षण करू इच्छिणाऱ्या लोकांची जगण्याची बिनशर्त इच्छा सिद्ध करतात.

आज संपूर्ण जगभरात अंतरराष्ट्रिय महिला दिन साजरा होत असताना युक्रेनमध्ये अडकलेल्या या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभा राहतो आहे. त्याचबरोरबर वाढता वेश्याव्यवसाय, गुलामगिरी अशा गंभीर परिस्थितीचे वास्तव रूप रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामध्ये समोर येत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT