Latest

Hotel tip : वेटरला मिळाली तब्‍बल साडे तीन लाखांची टिप! पण नोकरी गमावली

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

हॉटेलमध्‍ये जेवण झालं की, वेटरला 'टिप' ( सेवा मोबदला म्‍हणून पैस देणे) ( Hotel tip) दिली जाते. सर्वच ठिकाणी चांगली सेवा दिली की, ग्राहक स्‍वखुशीने न चुकता वेटरला टिप देतात. मात्र टिपसंदर्भातच एक अचंबित करणारा प्रकार अमेरिकेमध्‍ये घडला आहे. तो सर्वांनाच थक्‍क करणारा आहे.

एक उद्‍योगपती आपल्‍या पत्‍नीसह हॉटलमध्‍ये आले. यावेळी त्‍यांना सर्व्ह करण्‍यासाठी हॉटेलमधील महिला वेटर रयान ब्रांइड होती. तिने खूपच आदबीने त्‍यांचे स्‍वागत केले. तसेच खूपच काळजीपूर्वक सेवा पुरवली. यामुळे भारावलेल्‍या उद्‍योगपननीे रयान हिला तब्‍बल साडेतीन लाख रुपयांची टिप दिली. रयानसाठी हा सुखद धक्‍काच होता. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने आनंदाश्रूला वाट करुन दिली. मात्र तिचा हा आनंद क्षणभंगूरच ठरला.

Hotel tip : घसघशीत टीप मिळाली; पण नोकरी गमावली

रयानला उद्‍योगपतीने साडेतीन लाखांची टिप दिली. याची माहिती हॉटेलच्‍या मॅनेजरला मिळाली. त्‍याने दिला हॉटेलमधील सर्व वेट्‍सबरोबर टिप शेअर करायला सांगितले. वास्‍तविक रयानच्‍या सेवाभावी वृतीमुळे तिला एवढी मोठी टिप मिळाली होती. मॅनेजरच्‍या आदेशाने ती व्‍यथित झाली. तिला या आदेशाचा धक्‍काही बसला. कारण यापूर्वी हजारो रुपयांच्‍या टिप अनेकांना मिळाल्‍या होत्‍या;पण त्‍या शेअर करायला सांगितल्‍या नव्‍हत्‍या. त्‍यामुळे तिनेही नकार दिला. तसेच याची माहिती टिप देणार्‍या उद्‍योगपतीलाही सांगितली. मला मिळालेली टिप मी शेअर करणार नाही, असे तिने स्‍पष्‍ट केले; पण या निर्णयाचा मोठा फटका तिला बसला. टीप शेअर करण्‍यासंदर्भातील माहिती ग्राहकाल सांगितल्‍याचा ठपका ठेवत मॅनेजरने तिला थेट नोकरीवरुनच काढून टाकले.

टिप देणार्‍या उद्‍योगपतीने दिला मदतीचा हात

रयान ही शिक्षण घेत आहे. यासाठी तिने शैक्षणिक कर्जही काढले आहे. पार्ट टाईम म्‍हणून ती हॉटेलमध्‍ये वेटर म्‍हणून काम करते. तिला तब्‍बल साडेतीन लाख रुपयांची टिप मिळाली; पण याच कारणामुळे तिची नोकरीही गेली. याची माहिती मिळाल्‍यानंत तिला टिप देणारा उद्‍योगपतीच तिच्‍या मदतीला धावून आला आहे. त्‍याने रयानची नोकरी गेली असून तिला शैक्षणिक कर्ज परत करण्‍यासाठी मदत करावी, असे आवाहनही सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून केले आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT