Latest

Bypoll : महाराष्ट्रासह 6 राज्यांतील 7 विधानसभांच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी, मतदान सुरू

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bypoll : महाराष्ट्रातील मुंबईच्या अंधेरी पूर्व विधासभेच्या जागेसह 6 राज्यांतील 7 विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू झाले आहे. जवळपास सर्व जागांवर भाजप आणि प्रादेशिक पक्षांमध्ये सरळ टक्कर आहे. बिहारमध्ये मोकामा आणि गोपालगंज, हरियाणाच्या आदमपूर सीट, तेलंगनातील मनुगोडो सीट, यूपीच्या गोला गोकर्णनाथ आणि ओडिशाच्या धामनगर जागेवर आज पोटनिवडणूक होत आहे.

Bypoll : मुंबईतील अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय वळणानंतर आज मतदान सुरू आहे. निवडणुकीत ऋतुजा लटके या प्रबळ उमेदवार आहेत. ऋतुजा या दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपने या ठिकाणाहून निव़डणुकीतून माघार घेतली आहे. तर ओडिशाच्या धामनगर जागेवर देखिल बीजदच्या दिवंगत आमदारांच्या जागी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तिथे सहानुभूतीचा फायदा मिळू शकेल.

तर अन्य जागांवर भाजप आणि प्रादेशिक पक्षांमध्ये सरळ मुकाबला आहेत. दरम्यान नागरिकांनी सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्रावर यायला सुरुवात केली आहे. मतदान सुरू आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT