पुढारी ऑनलाईन डेस्क : 'द कश्मीर फाइल्स'च्या (The Kashmir Files) यशानंतर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी खुलासा केला की ते लवकरच त्यांचा पुढचा चित्रपट 'द दिल्ली फाइल्स' (The Delhi Files) वर काम सुरू करणार आहेत. चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरवरून ही माहिती शेअर केली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाच्या रेकॉर्डब्रेक कमाईबद्दल तुम्हाला माहिती असेलच. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांची वेदनादायी कथा रुपेरी पडद्यावर मांडून बरीच प्रशंसा मिळवली. छोट्या बजेटमध्ये बनलेल्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अग्निहोत्रींनी आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. (The Delhi Files)
द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाच्या यशानंतर विवेक रंजन अग्निहोत्री द दिल्ली फाइल्स (The Delhi Files) बनवणार आहेत. त्यांनी ट्विटवरून त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, 'मी त्या सर्व लोकांचे आभार मानतो ज्यांनी काश्मीर फाइल्स बनवण्यात मेहनत घेतली. गेली 4 वर्षे आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत घेतली. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार आणि त्यांच्यावरील अन्यायाबद्दल लोकांना सांगणे खूप महत्वाचे होते. आता माझ्या नवीन चित्रपटावर काम करण्याची वेळ आली आहे.'
पुढील ट्विटमध्ये, विवेक अग्निहोत्री यांने नवीन चित्रपटाची घोषणा करताना लिहिलंय की, '#TheDelhiFiles'. अग्निहोत्रींच्या या नव्या चित्रपटाची माहिती समजल्यानंतर लोकांची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर असे दिसते की अगामी दिल्ली फाइल्समध्ये काय दाखवणार आहेत हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली फाइल्समध्ये दाखवले जातील असा अंदाज अनेकांनी केला आहे. त्यामुळे काही लोकांनी विवेक अग्निहोत्री यांना नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
द काश्मीर फाइल्सच्या (The Kashmir Files) चित्रपटाद्वारे अग्निहोत्री यांनी इतिहासातील अनेक लपलेली रहस्ये लोकांसमोर आणली. त्यांनी 2019 मध्ये ताश्कंद फाइल्स (हू किल्ड शास्त्री?) या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.